सिंहगड मध्ये तीन दिवसीय राज्यस्तरीय योग प्रशिक्षण कार्यशाळा

1 min read

पुणे दि.६:- युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, रासेयो, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार रासेयो संचनालय, युवा व खेल मंत्रालय, भारत सरकार, पुणे यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या थीम “युथ फॉर माय भारत” व “युथ फॉर डिजिटल लिटरसी” याची अंमलबजावणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव बु. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून याचाच भाग म्हणून दिनांक 27 फेब्रुवारी 2025 ते 1 मार्च 2025 या कालावधीत योग प्रशिक्षण या विषयावरील तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.सदर प्रशिक्षण सिंहगड महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉल मध्ये घेण्यात आले असून यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमधून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये डॉ. प्रज्ञा पाटील योगाचार्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांकडून योग करून घेतले. प्रा. एस एस शास्त्री विभाग प्रमुख सिव्हिल इंजिनिअरिंग यांनी श्वासावर ताबा, प्राणायाम याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले.कार्यशाळेचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे, उपप्राचार्य डॉ. वाय. पी. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही एच बनकर प्रा. तृप्ती देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी प्रेम मांटे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे