बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

1 min read

पुणे दि.६:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५

मधील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहामध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या समारंभाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी मा. पृथ्वीराज मोहोळ व प्रसिद्ध सिने अभिनेत्री स्वराज्य रक्षक संभाजी फेम – राणू अक्का अश्विनी महांगडे यांची उपस्थिती आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शैक्षणिक, क्रीडा, संशोधन, प्रशासकिय कामे व सांस्कृतिक या विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रशासकिय सेवक या सर्वांचे अभिनंदन व कौतुक करण्यासाठी या समारंभाचे नियोजन असल्याचे स्पष्ट करत चालू शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या कार्याचा आढावा घेतला.या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, कार्यशाळा यामध्ये सादर केलेल्या शोधनिबंधांचे पुस्तक स्वरूपामध्ये प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘बेस्ट नॉन टीचींग ऑफ द इयर’ या पुरस्काराने पुरुष गटातून रामदास चिंचवडे यांचा सन्मान करण्यात आला. गेले अठरा वर्ष या महाविद्यालयात प्रशासकीय सेवेत आहे या कालावधीत महाविद्यालयाच्या प्रशासनामध्ये आपल्या कामाने ठसा उमटविला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे