सिंहगड मध्ये निर्भय कन्या अभियानांतर्गत कराटे प्रशिक्षणाचे आयोजन
1 min read
पुणे दि.६:- विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागामध्ये निर्भय कन्या अभियानांतर्गत कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या डायरेक्टर ऍडव्होकेट शुभांगी सोनावळे, इ व्हॉल्व हाय ग्लोबल स्कूल चे विभागप्रमुख तसेच युनिव्हर्सल स्पोर्ट्स स्कूल अँड अकॅडमीचे फाउंडर प्रेसिडेंट प्रा. नितीन रघुनाथ शेटे यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणासाठी विद्यार्थिनींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. निर्भय कन्या अभियाना अंतर्गत सदर प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे, उपप्रचार्य डॉ. वाय. पी. रेड्डी,
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे प्रमुख डॉ. एम. बी. माळी यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. एन. आर. धुमाळे यांनी सदर प्रशिक्षणाचे कामकाज पाहिले.