आरोपींच्या कृत्याचे फोटो समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेला :- आमदार सुरेश धस

1 min read

बीड दि.४:- स्व. सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला. त्याचे फोटो व्हिडिओ बाहेर आले.

माणुसकीला काळीमा फासणारी आणि बघता क्षणी डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना आहे. काल आरोपींच्या या कृत्याचे काही फोटो समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेला.

संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली हे विकृतीचं लक्षण आहे. ही क्रूर मानसिकता आपल्याला लवकरच ठेचावी लागेल. देशमुख कुटुंबीयांचा आक्रोश असह्य होतोय. आता दुसरा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

ही हैवानियत जिवंत राहिली तर कोणीही सुरक्षीत राहणार नाही. त्यासाठी आत्तापर्यंत मी ज्या तळमळीने आणि तडफडीने हे प्रकरण लाऊन धरले आहे त्याच पद्धतीने आरोपी फासावर जात नाहीत. तो पर्यंत मी या प्रकरणी तसूभरही मागे हटणार नाही. आता ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातच चालवावी यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे