महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठं गिफ्ट; ८ मार्चला दोन महिन्यांचा हप्ता जमा होणार
1 min read
मुंबई दि.४:- महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना योजनेचा हफ्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भातील माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. येत्या ८ मार्च महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत.महिला दिनाचं औचित्य साधून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा हफ्ता जमा करण्यात येणार.
असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. येत्या ८ तारखेला शनिवार असून महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनींसह सर्व महिलांसाठी सभागृहात एक विशेष सत्र पार पडणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अनुसरून थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत.
तर ५, ६ मार्चपासूनच याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, येत्या आठ मार्च रोजी विधीमंडळाचं विशेष सत्र होणार आहे. त्या दिवशी शनिवार असूनही हे सत्र होणार. खास महिला लोकप्रतिनिधिंसाठी व राज्यातील महिलांसाठी हे सत्र असेल.
याशिवाय राज्यातील जनतेची लाडकी योजना म्हणजेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबतही महत्त्वाची माहिती जनतेला द्यायची आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ मार्च रोजी वितरीत केला जाणार आहे.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
येत्या आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत. महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत.