राज्यात विद्यार्थ्यांना ५०० रुपयांचा मुद्रांक शुल्क माफ
1 min read
मुंबई दि.५:- राज्य सरकारच्या महसूल विभागाने विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक असते. प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर टाइप करावे लागते. या स्टॅम्पसाठी ५०० रुपये मोजावे लागत होते. हेच मुद्रांक शुल्क आता माफ करण्यात आले आहे. राज्यात १०० रुपयांना मिळणारा स्टॅम्प थेट ५०० रुपयांवर गेला आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत होता. विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी प्रतिज्ञापत्राची आवश्यकता असते. प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपवर टाइप करून द्यावे लागते.
टायपिंग आणि अन्य कामे मिळून सर्व खर्च २५० रुपयांपर्यंत होत होता. मात्र, आता स्टॅम्प पेपर ५०० रुपयांना झाला आहे. बाकीचा खर्च मिळून विद्यार्थ्यांना ७५० ते ८०० रुपयांपर्यंत पैसे खर्च करावे लागत होते.
काही वेळेस तर थेट हजार रुपयांपर्यंत खर्च जात होता. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपयांचा मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्याचे समजते.