आंबेगाव, जुन्नर उपविभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे
पुणे दि.१९: – जुन्नर, आंबेगाव विभागाचे प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी उपविभागाचे प्रांत अधिकारी म्हणून गोविंद शिंदे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. आंबेगाव, जुन्नर उपविभागाचे प्रांत अधिकारी म्हणून गोविंद शिंदे यांची शासनाने नियुक्ती केली असून शिर्डी परिसरामध्ये अनेक पायाभूत सुविधा आणि परिसर विकासासाठी शिंदे यांनी कामकाज केले आहे.
कार्यक्षम अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. सारंग कोडोलकर यांनी करोनाच्या महाभयंकर संकटात आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, बाधितांना तत्परतेने उपचार मिळण्यासाठी शिवनेरी जंबो कोविड सेंटरद्वारे उत्कृष्ट कामगिरी केली होती.
त्यांच्या कामाची दखल राज्य शासनाने घेऊन त्यांना सन्मानित केले होते. तसेच फासेपारधी, ठाकर, महादेव कोळी व अन्य भटक्या विमुक्त कुटुंबातील सदस्यांना जातीचे दाखले मिळून देण्यासाठी त्यांनी अनेक गावात शिबिराचे आयोजन केले होते.