आळेफाटा पोलिसांची नाकाबंदी दरम्यान २० वाहनांवर धडक कारवाई
1 min read
आळेफाटा दि.२१:- आळेफाटा (ता.जुन्नर) पोलीस ठाणे हद्दीत आळेफाटा चौक व विशाल पाटील पेट्रोल पंप चौक येथे पोलिसांनी आज नाकाबंदी लावून ७३ वाहने चेक केली. मोटार वाहन कायद्यान्वये १८ वाहनांवर कारवाई करण्यात आली तर ड्रिंक अँड ड्राईव्ह च्या २ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली.दोषी आढळणाऱ्या वाहनांवर व वाहन चालकांवर कारवाई केली.
यावेळी जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, 10 पोलीस अंमलदार व 5 होमगार्ड असे पथक कार्यरत होते.अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.
तर अशा प्रकारे नाकाबंदी करून वाहनांवर कारवाई केल्यास वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवरती चांगलाच वचक राहील. त्यामुळे अशी कारवाई आठवड्यातून दोन-तीन वेळा करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.