नारायणगाव ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर
1 min readनारायणगाव दि.२३:-नारायणगाव (ता.जुन्नर) येथील ग्रामीण रुग्णालयातला गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून रात्रपाळीला नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी कामाच्या वेळेत गावी असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय अधिकान्याच्या अनुपस्थित महिलेची प्रसूती करण्याची वेळ परिचारिकेवर आली. त्या मुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
तसेच अपघातात मृत झालेल्या तरुणाचा मृतदेह नारायणगाव ग्रामीण रुग्णालयातून जुन्नर येथे हलवावा लागला. मृतदेह काल सकाळी पुन्हा नारायणगाव ग्रामीण आहे. रुग्णालयात आणून शवविच्छेदन करावे लागले. यामुळे नातेवाइकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव ग्रामीण रुग्णालय आहे. शासनाच्या वतीने एक वैद्यकीय अधिक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, नेत्र चिकित्सा अधिकारी, क्ष किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रश अधिपरिचारीका व कर्मचारी आदी चोवीस कर्मचारी यांची नेमणूक शासनाने केली आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. रुग्णालयात तीस बेडची सुविधा उपलब्ध आहे.
सर्वसामान्य गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी शासन लाखो रुपये खर्च करते. मात्र, पूर्ण वेळ नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी कामाच्या वेळेत रुग्णालयात उपलब्ध राहत नसल्याने परिचारिका व कंत्राटी आयुष डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचे दिसून येत आहे.
“नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शर्मिला गायकवाड दीर्घ रजेवर आहेत. यामुळे नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचा अतिरिक्त भार माझ्याकडे देण्यात जाला आहे. रुग्णालयात महिन्याला साठ ते सत्तर महिलांची प्रसूती होते. बालकांचे लसीकरण शासनाच्या इतर सर्व वैद्यकीय सेवेचा लाभ रुग्णांना देण्याचा प्रयत्न आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील हे नेमणुकीस असताना कोणाला न सांगता ऑन ड्यूटी गावी गेले. ही त्यांची चूकच आहे. या बाबत त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात येईल.”
-डॉ. वैद्यनाथ काशीद, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, जुन्नर