भास्कर गाडगे यांनी जपलेला सामाजिक सलोखा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत ठरतोय फायदेशीर; मतदारांची मिळतीय खंबीर साथ

1 min read

जुन्नर दि.२३:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील उद्योगपती भास्कर गेनभाऊ गाडगे यांनी लोकपयोगी कामे करताना शेतकऱ्यांसाठीही कामे करता यावीत यासाठी जनतेच्या आग्रहास्तव जुन्नर कृषी उत्पन्न बाजासमितीच्या ग्रामपंचायत सदस्य मतदार संघातून सर्वसाधारण गटातून निवडणुकीमध्ये संचालक पदासाठी अर्ज दाखल केला आहे. यामधून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता यावा हाच एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून गाडगे हे निवडणुकीसाठी उभे आहेत. गावात भास्करशेठ गाडगे प्रतिष्ठान स्थापन करून गाडगे प्रतिष्ठान गोरगरीब जनतेसाठी काम करत आहे.सामाजिक कार्यात गाडगे यांचा महत्वाचा वाटा असतो.आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून भास्कर गाडगे सतत सामाजिक सलोखा जपत आले आहेत.

गाडगे यांच्या वडीलांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या ” सन्मती बालनिकेतन” या संस्थेस रु. १,५१,०००/- (एक लाख एक्कावन्न हजार रुपये) अर्थसहाय्य केले. तसेच वडीलांची ग्रंथतुला करुन त्यातील ग्रंथ निमगाव सावा येथील दिलीपराव वळसे पाटील महाविद्यालयास भेट देण्यात आले.

सन २०१६ मध्ये निमगांव सावा येथे मोफत सामुदायिक शुभविवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १५ शुभविवाह लावण्यात आले. या प्रसंगी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या “सन्मती बालनिकेतन” या संस्थेस रु. १,२५,०००/- अर्थसहाय्य केले. दुष्काळग्रस्त लातुर जिल्ह्यातील हसेगाव येथील “सेवालय ” संस्थेतील एच. आय. व्ही. ग्रस्त मुलांसाठी १०० कट्टे धान्य कावळ पिंपरी, पारगांव, औरंगपूर, साकोरी, निमगांव सावा, शिरोली, सुलतानपूर, बोरी बु. II, खोडद येथील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन वाटप करण्यात आले होते.

स्वतःच्या मुलीच्या लग्नामधील अनावश्यक खर्च टाळुन रु. १,११,०००/- (एक लाख अकरा हजार रुपये) अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या “सन्मती बालनिकेतन” या संस्थेस सहाय्य केले. पूरग्रस्तांच्या मदतीलाही ते धावून गेले महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा देत सव्वा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला.

भास्कर गाडगे प्रतिष्ठान तर्फे निमगांव सावा, खोडद, औरंगपूर, साकोरी व बोरी या गावातील एकूण ७५ मुले व कोंबरवाडी १, शिरोली ५५, सुलतानपूर ५६, साळवाडी ५९, भोरवाडी ३०, नगदवाडी ८४, वडगांव ११, कांदळी १७ आणि आणे, नळावणे, सुरकलवाडी, पेमदरा, शिंदेवाडी येथील ७० आणि साकोरी येथील १५५ असे एकुण ६१२ विद्यार्थी संपुर्ण शिक्षणासाठी दत्तक घेतले आहेत. गाडगे यांनी जुन्नर तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी सर्पदंश, हृदयविकार, अपघात व अन्य आपतकालीन परिस्थितीमध्ये रुग्नांना डिपॉझीट जमा करावे लागते परंतु अचानक एवढा पैसा उपलब्ध होत नाही म्हणुन डॉ. कोकणे हॉस्पिटल आळेफाटा व डॉ. राऊत हॉस्पिटल (नारायणगांव) या दोन्हीही हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी रुपये ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) कायमस्वरूपी ठेव ठेवली आहे.

निमगांव सावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते भास्कर गाडगे यांजकडून ट्रॅक्शन मशिन, बेबी वार्मर, इ.सी.जी. मशीन, रिसेप्शन टेबल, नेत्र तपासणी युनिट, फिजीयो थेरपी युनिट, खुच्यचि युनिट अशी एकुण रु. ३,००,०००/- (तीन लाख रुपये किंमतीची उपकरणे सप्रेम भेट देण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त निमगांव सावा येथे मोफत सर्व रोग निदान व विशेष आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले गेले. यामध्ये १३०० रुग्नांची तपासणी करण्यात आली.

औरंगपूर गावातील शिवसेना शाखाप्रमुख स्व. आनंद डुकरे यांच्या आकस्मित निधनानंतर त्यांच्या कुटूंबीयांना रु. १५,०००/- रोख मदत तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचा शालेय शिक्षणाचा संपूर्ण खर्च भास्कर गाडगे हे स्वतः करीत आहे. लातुर जिल्ह्यातील हसेगाव येथील “सेवालय ” या संस्थेतील कु. निशा व कु. मिनु या मुलींना संपूर्ण शैक्षणिक व त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी भास्कर गाडगे यांनी दत्तक घेतले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ह. भ. प. गोविंद महाराज केंद्रे यांच्या दिंडीस गेल्या ९ वर्षापासुन दरवर्षी २१ किंटल मोफत धान्य वाटप व यावर्षी ७५ कट्टे गहु वाटप करण्यात आले.

गाडगे यांनी अनाथाच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सन्मती बालनिकेतन या संस्थेस ५१,०००/- (एकावन्न हजार रुपये) आर्थिक मदत केली.कोणत्याही रुग्णाला जर रक्त उपलब्ध होत नसेल तर त्या रुग्णाला भास्करशेठ गाडगे प्रतिष्ठान तर्फे मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते. गाडगे यांनी आपले वडील स्व. गेनभाऊ तुकाराम गाडगे यांचे स्मरणार्थ निमगांव सावा येथील हनुमान मंदिरासमोरील सभामंडपासाठी रुपये २,००,०००/- (दोन लक्ष रुपये) देण्याचे जाहीर केले आहे. गाडगे यांनी आपल्या कमाईमधुन असे लाखो रुपये समाज सेवेसाठी खर्च करून आपण समाजाचे काही देणे लागतो याची खऱ्या अर्थाने जान ठेवलेली असुन हे कार्य यापुढेही असेच अखंडपणे चालु राहणार आहे.असे गाडगे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

गाडगे यांच्या कार्याची शिवसेना पक्षाने दाखल घेतली आणि त्यांची जुन्नर तालुका शिवसहकार संघटकपदी निवड केली. सामाजिक कार्यासाठी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्याचा त्यांचा वसा चालूच आहे परंतु शेतकऱ्यांसाठीही कामे करता यावी यासाठी जनतेच्या आग्रहास्तव जुन्नर कृषी उत्पन्न बाजासमितीच्या निवडणुकीमध्ये संचालक पदासाठी अर्ज दाखल केला असून त्यांना मतदारांची मोठी साथ मिळत आहे.त्यांच्या कार्यामुळे गाडगे हे बाजार समितीच्या पदावर सहज निवडून जातील अशी खात्री व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे