लॉज चालकांचे नियम धाब्यावर; आळेफाटा पोलिसांकडून व्यावसायिकांना सूचना

1 min read

आळेफाटा दि.२७:- आळेफाटा (ता.जुन्नर) परिसरात काही लॉज व्यावसायिकांनी नियम धाब्यावर बसवल्याने आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी लॉज व्यावसायिक चालक/मालकांची बैठक घेऊन सूचना दिल्या. या बाबत सविस्तर माहिती अशी की शासनाने लॉजिंग चालविण्यासाठी कडक नियम घालून दिले आहेत. लॉजचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून ओळखपत्र घेणे सक्तीचे आहे.

लॉजचा वापर कोणत्या कारणासाठी होणार आहे, याचाही उल्लेख रजिस्टरमध्ये आवश्यक असतो. मात्र असे कोणतेही नियम काही लॉजधारकांकडून पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलिसांनी ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पोलीस निरीक्षक नलावडे यांनी खालील सूचना देण्यात आलेल्या आहेत.अठरा वर्षा खालील मुलगा किंवा मुलगी हे आल्यास त्यांचे बाबत खात्री केल्याशिवाय प्रवेश देऊ नये.

ग्राहकांचे ओळख पत्राची मूळ प्रत पाहून खात्रीअंती झेरॉक्स घ्यावी. आलेल्या ग्राहकांचे चेहरे आपल्या सीसीटीव्हीमध्ये येणे आवश्यक आहे. तोंडाला स्कार्फ बांधून किंवा मास्क घालून लॉज मध्ये प्रवेश देऊ नये. लॉज मध्ये येणाऱ्या ग्राहकांचे वाहनांची व चालकांचे नाव पत्ता व मोबाईल नंबर नोंदविणे आवश्यक आहे.

लॉज मध्ये येणारे ग्राहकांची व त्यांची वाहनांच्या क्रमांकाचे चित्रण होईल असे सीसीटीव्ही लॉजच्या बाहेर रस्त्यावर लॉज मध्ये येण्या जाण्याच्या मार्गावर असावे. ग्राहक म्हणून येणारे मुले, मुली व इतर यांचे संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता व ओळखपत्र क्रमांक मोबाईल नंबर नोंदवून आयडी प्रूफ साक्षांकित करून घेणे.लॉज चा वापर जुगार मद्य पीने व इतर कोणत्याही अवैध करण्यासाठी होणार नाही याची काळजी घ्यावी.

लॉज मध्ये संशयित व गुन्हेगार असल्याचे आढळल्यास पोलिसांना संपर्क साधावा.विदेशी ग्राहक राहण्यास आल्यास त्याची सर्व आवश्यक माहिती पारपत्र विभाग पुणे ग्रामीण व स्थानिक पोलीस स्टेशन यांना कळविण्यात क्रम प्राप्त आहे.तुमच्याकडे ठेवलेले नोकर यांचे चरित्र पडताळणी करून त्यांचे मूळ गावचा संपूर्ण पत्ता होतो फोन नंबर याची खात्री करून कामावर ठेवणे. या सुचना दिल्या.त्यामुळे आता आंबट शौकिनांची मोठी धांदल उडाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे