कौतुकास्पद!…शेतकऱ्याच्या चारही आपत्यांची एकच वेळी महाराष्ट्र पोलीस दलात निवड

1 min read

आळेफाटा दि.२८:- वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील सर्वसाधारण शेतकऱ्याच्या चारही मुलांची पुणे ग्रामीण पोलीस दलात निवड झाली असल्याने चौघांचं ही जुन्नर तालुक्यातुन कौतुक होत आहे. शेतकरी विजय गाडेकर हे आपली शेती करून खडतर प्रवासात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना त्यांचे स्वप्न होते की आपल्या चारही मुलांनी पोलीस दलात दाखल होऊन देश सेवा करावी आज त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता.

दिपक गाडेकर, अंकिता गाडेकर, सारिका गाडेकर आणी आशा गाडेकर असे या चारही भावंडांची नावे असून चारही जणांची महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्ती झाली आहे. या चारही भावंडांना पहिल्यापासूनच शालेय जीवनातून अभ्यासाची गोडी असताना मनात जिद्द होती की आपण काहीतरी करू शकतो.

यासाठी त्यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आनंद उच्च शिक्षण बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे या ठिकाणी पूर्ण करून पुढे आळेफाटा येथील एका करिअर अकॅडमीत प्रशिक्षण घेत विविध परीक्षांचा अभ्यास पूर्ण करत चारही भावंडांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होऊन एक आदर्श समाजापुढे दाखवून दिला आहे.

आई-वडिलांच्या अथक परिश्रम व कष्टाला सार्थ होत त्यांनी हे यश मिळवले आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व परिसरातून व वडगाव आनंद ग्रामस्थांकडून तसेच सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे