तळ्याई देवीच्या यात्रोत्सवानिमित्त महिलांनी डोक्यावर कलशपात्र घेऊन काढलेली मिरवणूक

बेल्हे दि.२९ : गुळूंचवाडी (ता. जुन्नर ) येथील देवकर मळा येथे तळ्याई मित्र मंडळाच्या वतीने तळ्याई देवीचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेनिमित्त सकाळी सात वाजता दुचाकी चारचाकी तसेच ट्रॅक्टरच्या साहाय्याने मांडव डहाळ्यांची मिरवणूक काढण्यात आली होती.

मिरवणुकीमध्ये गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली दिसत होती. तसेच महिलांनी डोक्यावर कलशपात्र घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
मांडवडहाळ्यानंतर भटजी काका देशपांडे यांच्या हस्ते देवीची पूजा अभिषेक आणि चोळी पातळ करून आरती करण्यात आली.

मंदिर परिसरात दुपारी महिलांनी संगीत खुर्ची, फुगड्या अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तसेच विजेत्या स्पर्धकास तळ्याई मित्र मंडळाच्या वतीने रोख बक्षीस वाटप करण्यात आले. सायंकाळी पाच ते सात दरम्यान प्रवचन व हरिपाठ करण्यात आला.

प्रवचन हरिपाठ नंतर रात्री सात ते नऊ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादानंतर स्वरांजली कलामंच निर्मित गौरव माझ्या महाराष्ट्राचा यांचा लोकगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमावेळी तळ्याई मित्र मंडळाचे कार्यकर्ते संतोष आग्रे, नामदेव आग्रे, गंगाराम गुंजाळ,

ज्ञानेश्वर देवकर, संभाजी देवकर, रामदास देवकर, सोपान देवकर, गणेश देवकर, दादाभाऊ देवकर, विशाल देवकर, जालिंदर देवकर, मछींद्र देवकर, कारभारी देवकर, बाळासाहेब देवकर, सुभाष देवकर, तळ्याई मित्र मंडळ, केशव काळे मित्र मंडळ तसेच समस्त ग्रामस्थांनी यशस्वीरित्या नियोजन केले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे