पिंपळवंडीचा राहुल फुलमाळी ठरला आळे केसरी; लाखो भाविकांनी घेतले दर्शन; यंदाची यात्रा उत्साहात संपन्न

1 min read

आळेफाटा दि.१८:- श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या श्री क्षेत्र आळे (ता.जुन्नर) येथील रेडा समाधी यात्रौत्सवाच्या निमित्ताने भव्य अश्या कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा ची यात्रा अतिशय उत्साहात पार पडली असून यात्रा कालावधीमध्ये लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

संपूर्ण हंगामाचे उत्तम नियोजन गावातील संपूर्ण माळी समाजाच्या वतीने करण्यात येते. यावेळी अंतीम कुस्तीची लढत पिंपळवंडीचा राहुल फुलमाळी व कोपरगावचा संदीप कहाणे यांच्यात झाली. या लढतीत आळे केसरी 2023 मानाच्या गदेचा मानकरी राहुल फुलमाळी ठरला.२५ हजार रुपये व मानाची चांदीची गदा अस बक्षिसाच स्वरूप होत. मानाची गदा कै. महादेव रामजी कोकाटे यांच्या स्मरणार्थ त्यांचे भाचे निलेश सुरेश शिंदे यांच्याकडून दिली जाते.

या प्रसंगी जिल्हा परीषदेचे सदस्य शरद लेंडे, माऊली खंडागळे, आळे गावचे सरपंच प्रितम काळे, उपसरपंच अँड. विजय कु-हाडे,आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, रागिणी कराळे, नवनाथ निमसे,दिनेश सहाने, मंगेश काकडे, तुषार शहाणे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

या कुस्ती आखाडय़ात २५० लहान मोठया कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. विशेष आकर्षण ठरले ते मुलींची रोमहर्षक कुस्त्या. या मुलींनी उपस्थितांची प्रेक्षकांची मने जिंकली.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मल्ल आले होते तर ३५ महिला पैलवानांनी सुद्धा या हंगामामध्ये उपस्थिती दर्शवली. महिलांची ही अटीतटीच्या लढती झाल्या.यावेळी समालोचन, निलेश भुजबळ, जीवन शिंदे,निलेश शिंदे,उदय पाटील भुजबळ, यांणी केले तर पंच म्हणून गोपीचंद मेहेर,संजय भुजबळ,पप्पू डोंगरे,सुभाष डोके यांणी काम पाहीले.या आखाड्यात उदघाटन प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष धनंजय काळे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, माऊली कु-हाडे, पंचायत समीतीचे माजी सदस्य जिवन शिंदे, नेताजी डोके,

यात्रा कमिटीचे अध्यक्ष एकनाथ कु-हाडे, अविनाश कु-हाडे, कान्हु पाटील कु-हाडे, संतोष पाडेकर, संजय खंडागळे,प्रसन्न अण्णा डोके,दिगंबर घोडेकर, चंद्रकांत भुजबळ, सुदर्शन पाटील भुजबळ, निलेश भुजबळ, उदय पाटील भुजबळ,चारुदत्त साबळे,संजय शिंदे,निलेश शिंदे,सौरभ डोके,संजय पाटील भुजबळ,चंद्रकांत पाटील भुजबळ,गणेश शिंदे,महेंद्र शिंदे,जितेंद्र शिंदे,कैलास शिंदे,पपु डोंगरे,दशरथ भुजबळ आदीनी चोख नियोजन केले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे