भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
1 min read
निमगाव सावा दि.१६:- श्री.पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी. श्री.पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
नजिरभाई चौगुले मा.उपसरपंच निमगाव सावा व किरण गोत्राळ सामाजिक कार्यकर्ते यांनी दोन्ही प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.नंतर दिप प्रज्वलन केले. त्यानंतर वाचनालयाचे संचालक संजय उनवणे, किरण गोत्राळ,नजिर चौगुले यांनी दोन्ही महापुरुषांच्या बाबतीत थोडक्यात माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी नजिरभाई चौगुले माजी उपसरपंच, किरण गोत्राळ सामाजिक कार्यकर्ते, रूपेश जावळे भीमशक्ती संघटना, सुभाष जावळे,संजय उनवणे संचालक,सखाहरी खाडे संचालक, पप्पू बेहडे, राजाराम गाडगे,नासिर पटेल,दिलावर पटेल,छबन आल्हाट, पंढरीनाथ घोडे ग्रंथपाल, सलमान पठाण उपस्थित होते.नंतर चहापानाचा कार्यक्रम झाला व कार्यक्रम संपन्न झाला.