आजोबांच्या हौसेला मोल नाही, नातवांच्या वाढदिवसाला तब्बल १ लाख ४० हजार रुपये…..

1 min read

दौंड दि.१३:- समाजात एखाद्याच्या वाढदिवसाला आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, बैलगाडा शर्यती, कुस्ती स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आदी उपक्रम आयोजित केले जातात. परंतु देलवडी (ता. दौंड) येथील माऊली वाघोले पाटील या आजोबांनी आपल्या तन्मय वाघोले पाटील व चिन्मय वाघोले पाटील या चिमुकल्या नातवांच्या वाढदिवसानिमित्त चक्क महाराष्ट्रातील सर्वात मोठा रघुवीर खेडेकर यांचा लोकनाट्य तमाशा मनोरंजन म्हणून आयोजित केला होता. या हौशेची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.विशेष म्हणजे आजोबांनी यासाठी १ लाख ४० हजार रुपये मोजले आहेत. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक, माजी आमदार रमेश थोरात, पारगावचे सरपंच सुभाष बोत्रे, बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, माजी उपसभापती सयाजी ताकवणे, बाळासाहेब थोरात, शिवाजी वाघोले, दत्तात्रेय शेलार, अर्जुन वाघोले उपस्थित होते. लोकनाट्य तमाशातील तब्बल १०० कलावंत कलाकारीतून चिमुकल्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. लोकनाट्य तमाशा आतापर्यंत गावोगावच्या यात्रेच्या निमित्ताने होत असतो, असा पायंडा आहे. परंतु पहिल्यांदाच वाढदिवसाच्या निमित्ताने हा तमाशा होत असल्याने अनेक तमाशा शौकिनांनी गर्दी केली होती. लोकनाट्य तमाशाचे मालक रघुबीर खेडकर म्हणाले की, पूर्वी तिकिटावरती तमाशा असायचा.

त्यानंतर गावोगावच्या यात्रेनिमित्त तमाशा सुरू झाला. वाघोले हे नातवांच्या वाढदिवसानिमित्त तमाशा घ्यावा, यासाठी माझ्याकडे अनेक दिवसांपासून आग्रही होते. वाढदिवसानिमित्त स्पेशल लावणी सादर करीत या चिमुकल्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे