मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिचरणी
1 min read
शनी शिंगणापूर दि.१२:- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री शनैश्वर मूर्तीस व उदासी महाराज मठात अभिषेक करण्यात आला.
शिर्डी येथे होत असलेल्या भाजप प्रदेश महाधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे पदाधिकारी अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. त्यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
तर शनिशिंगणापूर हेलिपॅड येथे आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.