राज्यातील २४ लाख ८८ हजार ‘लाडक्या बहिणीं’ना मिळाले तीन मोफत सिलिंडर
1 min read
मुंबई दि.१२:- महायुती सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत गेल्या पाच महिन्यांत राज्यात मोफत २४ लाख ८८ हजार ४७ एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा खर्च सरकारने उचलल्यामुळे ‘लाडक्या बहिणीं’ ना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘उज्ज्वला योजने’च्या धर्तीवर राज्यात तत्कालीन महायुती सरकारच्या २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत दरमहा १ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत घेणाऱ्या महिलांसाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ अंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली गेली होती. ३० जुलै रोजी त्याचे परिपत्रकही निघाले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांच्या नावावर कनेक्शन असणे बंधनकारकहोते. याच योजनेतून राज्यात गेल्या महिन्यात २४ लाख ८८ हजार ४७ एलपीजी सिलिंडरचे वाटप केले गेले.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसते की, ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ या पाच महिन्यांत मुंबई शहरात १० हजार २६८, मुंबई उपनगरात १ लाख २८ हजार ८२३, ठाण्यात १ लाख २६ हजार ९८५, पुण्यात २ लाख ५८ हजार ८८०, नागपुरात २ लाख ५८ हजार २४४ लाडक्या बहिणीना मोफत तीन सिलिंडर देण्यात आले आहेत.
मोफत गॅस सिलिंडर २ वाटपाची जबाबदारीया तेल कंपन्यांकडे आहे. त्याबदल्यात सरकार तेल कंपन्यांना प्रतिसिलिंडर सरासरी ८३० रुपये देत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागातून मिळाली.या सर्व महिलांकडे इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत २ पेट्रोलियमसारख्या तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांची कनेक्शन आहेत.