निधन वार्ता- माजी सरपंच शिवाजीराव चव्हाण दुःखद निधन
1 min read
बेल्हे दि.८:- पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील माजी सरपंच, प्रगतशील शेतकरी व ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व शिवाजीराव नानाजी चव्हाण (वय ८४) यांचे, नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा विशेष सहभाग होता. गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व प्रगतशील शेतकरी, हुंडेकरी व शेतीचे खत-औषधाचे व्यावसायिक म्हणूनही ते परिचित होते. परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसायातील मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे मोलाचे योगदान होते. दरम्यान उद्योजक संभाजी चव्हाण, प्रगतशील शेतकरी राजाराम चव्हाण हे त्यांचे सुपुत्र होत. तसेच माजी सरपंच लताताई संभाजी चव्हाण या त्यांच्या स्नुषा (सूनबाई) होत.