श्रीराम महिला बचत गटाने सुरू केले पुण्यश्री सुपर होलसेल व रिटेल या किराणा मालाचे दुकान
1 min readबेल्हे दि.३;- राजुरी मध्ये श्रीराम महिला बचत गटाने पुण्यश्री सुपर किराणा मॉल होलसेल व रिटेल या किराणा मालाचे दुकानाचे उद्घाटन तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सरपंच प्रिया हाडवळे, शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम.डी.घंगाळे, एकनाथ शिंदे, लाखणगाव चे माजी सरपंच विद्यमान सदस्य दस्तगीर मुजावर, चंद्रकांत जाधव, माऊली हाडवळे, राजेंद्र हाडवळे, भगवान औटी,संगिता शेळके, लक्ष्मण फावडे, अमोल शिंदे, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य तसेच श्रीराम महिला बचत गटाच्या अध्यक्ष प्रतिभा आवटे, सचिव शारदा ताजवे, उपाध्यक्ष राणी विश्वासराव सुरेखा औटी, बेबी रायकर, आरती शिंदे, तायरा इनामदार ,जयश्री ताजवे, मुमताज जमादार, वंदना बनकर, इत्यादी गटातील सदस्य उपस्थित होते.