फडात जाऊन केला ऊसतोड कामगारांचा सन्मान
1 min read
आळे दि.२९:- जुन्नर तालुक्यातील आळे लवणवाडी येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सभासद बापू शंकर कुऱ्हाडे व रेश्मा सुरेश कुऱ्हाडे यांच्याकडे ऊसतोड सुरू झाल्याने त्यांनी नाशिक जिल्ह्यातील
ऊस मजूर असल्याने त्यांचे टोळी मुकादम छोटू राम नारायण सोनवणे यांचा फेटा टॉवेल टोपी व पत्नी भोरीबाई यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. सदर ऊस टोळी ही भाटेपाडा ता. सटाणा, जि. नाशिक येथील असून विघ्नहर कारखान्याचे मुकादम उल्हास सहाणे आहेत. विघ्नहर सहकारी साखर कारखाना पिंपळवंडी- आळे गटात मोठ्या ऊस प्रमाणावर
असल्याने व महाराष्ट्र शासनाने गाळप हंगामास उशिरा परवानगी दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे ऊस 17 ते 18 महिन्याचे झाले. असल्याने ऊस टोळ्या पहाटेच ऊस क्षेत्रात ऊस तोडण्यासाठी येतात.