वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नारायणगावला वाहनतळ उभारणार:- आमदार शरद सोनवणे
1 min read
नारायणगाव दि.२९:- नारायणगाव बस स्थानकाला प्रवाशांच्या सेवेसाठी २० नवीन आधुनिक बस उपलब्ध करून देणार असून स्थानकात एसटी कामगारांसाठी विश्रांती शेड, तसेच नारायणगाव शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच अत्याधुनिक वाहनतळ उभारण्यात येईल. असे आश्वासन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी नारायणगाव येथे दिले आहे.आमदार शरद सोनवणे यांनी गुरुवार दि. २६ नारायणगाव एसटी बस आगाराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, अॅड. राजेंद्र कोल्हे, अॅड. प्रवीण मदगुले, तौसिफ कुरेशी,
संतोष वारुळे, धनंजय माताडे, सुनील इचके, ईश्वर पाटे, अभिजीत शेटे व नारायणगाव एसटी बस आगार व्यवस्थापक वसंत अरगडे, वाहतूक निरीक्षक शुभम खरमाळे उपस्थित होते.आ. शरद सोनवणे यांनी एसटी आगारातील बस स्थानकाची पाहणी करून.
नारायणगाव शहरात वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी एसटी बस स्थानकाच्या परिसरात आधुनिक वाहनतळ उभारण्यात येईल.
तसेच नारायणगाव एसटी बस आगारात एसटी बस कमी आहेत. वाढती प्रवाशी संख्या पाहता नवीन २० बस गाड्या, मिनी बसेससाठी शेड, आगारातील चालक वाहक यांना विश्रांतीसाठी शेड उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार सोनवणे यांनी दिले.
सध्या नारायणगाव आगारात एकूण ६२ गाड्या असून यामध्ये ५२ साध्या गाड्या व १० मिनी बस आहेत. नारायणगाव बस आगाराची प्रवाशांची दैनंदिन क्षमता पाहता किमान १०० बसेसची आवश्यकता आहे.
त्यामुळे आमदार सोनवणे यांनी परिवहन मंत्र्यांकडे नवीन अत्याधुनिक गाड्यासाठी पाठपुरावा करून उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले.