उंचखडकच्या सरपंच पदी अजय कणसे यांची बिनविरोध निवड
1 min read
बेल्हे दि.१८:- उंचखडक (ता.जुन्नर) येथील सरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले असल्याकारणाने तहसीलदार सुनील शेळके यांच्या आदेशानुसार संजय गायकवाड मंडलअधिकारी बेल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि.१८ रोजी निवड प्रक्रिया राबवण्यात आली.
तरी १० ते १२ या दरम्यान अजय मारुती कणसे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने त्यांची सरपंच पदी निवड करण्यात आली आहे. असे अध्यक्ष अधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.
तसेच त्यांच्याबरोबर धनाजी भोसले ग्राम महसूल अधिकारी व सचिन शिंदे ग्रामपंचायत अधिकारी यांनी कामकाज पाहिले व अजय मारुती कणसे यांची बिनविरोध सरपंच पदाकरिता निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले.
या वेळी उद्योजक पंकज कणसे, सुनील कणसे, सुभाष कणसे, नवनाथ कणसे, दत्ता कणसे, विशाल कणसे, सुरेश कणसे, भैरू कणसे, विठ्ठल कणसे आदी उपस्थित होते.