महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये विशाल जुन्नर पतसंस्था अग्रगण्य:- आमदार शरद सोनवणे

1 min read

आळेफाटा दि.१९:- विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई पुणे ग्रामीण विभागात संस्थेच्या वतीने आळेफाटा सावता महाराज सांस्कृतिक सभागृह येथे सकाळी ११ वाजता तर संध्याकाळी ४.३० वाजता हाॅटेल टक्सन नारायणगाव येथे सभासद प्रशिक्षण व गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण पारखे, उपाध्यक्ष अमित घनदाट संचालक सुभाष वाबळे, शिवाजी कोकणे, संजय गोसावी, सुभाष पाडेकर, भास्कर गाडगे, दीपक सोनवणे, सुप्रिया मेटांगळे, रेश्मा काळे विशाल जुन्नर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक सोनवणे व विशाल जुन्नर सेवा मंडळाचे संचालक विक्रांत काळे उपस्थित होते. अधिकारी व कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सत्कारार्थी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सभासद प्रशिक्षण महाराष्ट्र सहकार बोर्डाचे प्रशिक्षक सुनिल केदारी यांनी दिले. उपस्थित महिलांना हळदीकुंकू समारंभानिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशाल जुन्नर पतसंस्था नेहमीच प्रोत्साहन देत असते. अशा प्रकारचे सत्कार पुढील जीवनात नेहमीच उर्जा देतात म्हणूनच विशाल जुन्नरचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.आळेफाटा येथील कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार शरद सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांमध्ये विशाल जुन्नर पतसंस्थेचे स्थान असून. संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले सहकार, शैक्षणिक, सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, सहकारातील विकासात्मक व संस्थांचे प्रश्न सरकारदरबारी मांडण्यासाठी माझी आग्रही भूमिका असेल या आपल्या संस्थेचा घटक म्हणून मी त्यासाठी कायम कटिबद्ध आहे असे मत व्यक्त केले. अध्यक्ष अरूण पारखे यांनी आपल्या मनोगतात संस्था सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करत असून २१०० कोटींच्या एकत्रित आर्थिक व्यवसायाचे व ५१ शाखांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सभासदांच्या पाठबळावर हे उद्दिष्ट संचालक मंडळ सहज पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करत सर्व उपस्थितांचे आभार मानले.आळेफाटा येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक अतुल वाबळे, प्रास्तविक संचालक संजय गोसावी यांनी केले.तर नारायणगाव येथे सूत्रसंचालन कर्मचारी प्रतिनिधी दिगंबर तांबोळी व राजेंद्र नवले यांनी तर आर्थिक दृष्टिक्षेप कार्यलक्षी संचालक किसन खांडगे यांनी मांडला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे