जुन्नरमध्ये ४४२२ प्रकरणे तडजोडीने निकाली; ३ कोटी ४० लाख रुपयांची वसुली
1 min read
जुन्नर दि.१७:- मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा समिती यांनी जुन्नर न्यायालयामध्ये दिवाणी फौजदारी प्रलंबित तसेच दाखल पूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोक न्यायालयाचे आयोजन केले होते. जुन्नर शहरामध्ये आयोजित लोक न्यायालयामध्ये ४४२२ विविध प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली असून ३ कोटी ४० लाख ८८ हजार रुपयांची यावेळी वसुली झाली आहे. पक्षकार अशोक सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दिवाणी न्यायाधीश नम्रता बिरादार, स्वप्ना घुले, गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, लहू थाटे आदींसह वकील, पक्षकार उपस्थित होते.