वनविभागाच्या जागेत पोकलँडच्या सहाय्याने विहीर खोदणाऱ्या आरोपी वर कारवाई; तीन दिवसाची पोलिस कोठडी
1 min read
वडगाव कांदळी दि.१८:- वडगाव कांदळी (ता.जुन्नर) राखीव वन कक्ष क्रं ४४ मध्ये अवैधरित्या पोकलैंड मशीनच्या सहाय्याने विहीर खोदण्याचे काम चालू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली नुसार वनपरिक्षेत्र ओतूर स्टाफ ने घटनास्थळी जावुन सदर अवैध काम थांबवण्याची कारवाई करण्यास गेले असता. तेथे मोठे संख्या जमावाने त्यास प्रतिबंध करून अटकाव केल्याने कारवाई करता आली नव्हती. त्याअनुषंगाने त्यानंतर वनविभाग सदर पोकलैंड मशीन चा मालक/आरोपीच्या शोधात होते. दरम्यान सदर पोकलैंड मशीन हे राजाराम ज्ञानदेव फापाळे (रा.बेलापुर ता. अकोले जि. अहमदनगर)
याने इतर आरोपींसोबत संगनमताने पोकलैंड मशीन सह वडगाव कांदळी येथील शासकीय राखीव वनात जावुन वनाच्या हद्दी खुणा नष्ट करून तेथील झाडे झुडपे साफ सफाई करून वनक्षेत्रात विहीर खोदल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्या विरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ए.डी.ई.एफ.जी.एच,
कलम ६३ सी अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन त्यास दि. १६/१२/२०२४. रोजी अटक करणेत आली.सदर आरोपीस दि १७/१२/२०२४ रोजी मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांचे न्यायालयात हजर केले असता शासनाच्या वतीने सहा. सरकारी वकील अवचर व वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ यांनी केला.
न्यायालयाने सदर गुन्हयात वापरण्यात आलेले पोकलैंड मशीन तसेच सहभागी इतर आरोपींचा शोध घेवून तपास करण्यासाठी आरोपीस ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहु ठोकळ, म्हणाले कि शासकीय राखीव वनात अपप्रवेश करणे.
वनांच्या हद्दी खुणा नष्ट करणे, राखीव वनात वृक्षतोड करणे तसेच अवैध उत्खनन व खुदाई करणे भारतीय वनअधिनियम १९२७ च्या तरतुदींचे उल्लंघन असुन अशा कृत्याकरिता जास्तीत जास्त २ वर्ष इतक्या शिक्षेची तसेच रू. ५०००/- इतक्या दंडाची तरतुद करण्यात आली असल्याने अशा अवैध कृत्यासाठी वनवभिागामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल.
सदर कारवाई अमोल सातपुते (उपवनसंरक्षक वनविभाग जुन्नर) यांचे मार्गदर्शनाखाली अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर, लहु ठोकळ वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर, निकीता बोटकर परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनपरिक्षेत्र ओतूर स्टाफ समवेत पार पाडली असुन पुढील तपास लहु ठोकळ वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.