जुन्नर बसस्थानकात पिकअप चालकाचा स्टंट अंगलट; पोलिसांनी घेतले ताब्यात

1 min read

जुन्नर दि.१६:- जुन्नरच्या बसस्थानकात पिकअपचा स्टंट करुन चालविणाऱ्या पिकअप चालकाला जुन्नर पोलिसांनी गजाआड केले आहे. शहाजी ज्ञानेश्वर सोनवणे (रा. पंचलिंग झोपडपट्टी) जुन्नर असे या पिकअप चालकाचे नाव आहे.त्याने १३ डिसेंबर रोजी जुन्नर एसटी स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींची गर्दी असताना, पिकअप चालवत आवारात आणली आणि गिअर टाकून तिला वेगात उचलून चालवू लागला. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्याचा हा स्टंट कोणाच्याही जीवावर बेतू शकला असता, मात्र या स्टंटबाजीचा व्हिडीओ काही जणांनी सोशल मिडीयावर पोस्ट केल्याने जुन्नर पोलिसांपुढे या पिकअप चालकाचा शोध घेण्याचे आवाहन होते. याची दखल घेऊन पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी स्टंटबाजी केलेल्या पिकअपचा (एमएच १२ एसएक्स ६९०७) शोध घेतला असता, ही गाडी आरोपी सोनवणे याने चालवून स्टंटबाजी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याने स्टंट केलेली पिकअप देखील ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई महादेव वणवे यांनी जुन्नर पोलिसांत फिर्याद दिली. आरोपी सोनवणे याला पोलिसांनी पिकअपसह ताब्यात घेऊन कारवाई केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे