कुत्र्याला दगड मारल्याने दोन गटात हाणामारी; चाकूने जिवे मारण्याचा प्रयत्न
1 min read
परभणी दि.१३- कुत्र्याला दगड मारण्यावरून झालेल्या वादात दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात चाकूने मारून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रात्री नऊच्या सुमारास सवेरा कॉलनी भागात घडली. याप्रकरणी १० डिसेंबरला दोन्ही गटाच्या तक्रारीवरून नानल पेठ पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिर्झा अल्ताफ बेग यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपींनी संगनमत करत शिवीगाळ करत मारहाण केली. दुसरी तक्रार सय्यद इर्शाद यांनी दिली. आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून फिर्यादीला चिडवले. त्यानंतर चाकूने वार करत गंभीर जखमी केले.
