जियो कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून महिलेच्या खात्यातून ३ लाख २८ हजार रुपये केले गायब
1 min read
बेल्हे दि.१९:- जियो कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून महिलेच्या खात्यातून ३ लाख २८ केले गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या याबाबत आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिपाली दिनकर आंग्रे रा.कोंबरवाडी (बेल्हे) यांनी पोलिस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांना दि.७ डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला.
त्यावरून बोलत असलेल्या व्यक्तीने तो जिओ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले की जिओ कंपनीची टेस्टिंग चालू आहे तुम्हीं फोन उचलू नका असे बोलल्यामुळे पती दिनकर आग्रे यांनी फोन कट केला त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी पतीच्या मोबाईलवर चार पाच मेसेज आले.
परंतु आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर थोड्याच वेळात आमचे मोबाईलची रेंज गेली व फोन येणे जाणे बंद झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.८रविवार रोजी माझे पती यांनी जिओ मोबाइल कंपनीचे गॅलरी मधे जाऊन चौकशी केली असता.
त्यांना असे कळले की, गॅलरी दि.१० तारखेपर्यंत बंद असल्याचे समजले. त्यानंतर माझे पती यांनी दि.११ रोजी जिओ कंपनीचे गॅलरी मधे जाऊन मोबाइल चे सिमकार्ड बंद पडले असलेबाबत चौकशी केली असता तेथील जिओ कंपनीचे कर्मचाऱ्यांने मोबाईलचे सिमकार्ड खराब झालेले असल्याचे सांगितले.
सांगुन नवीन जिओ कंपनीचे सिमकार्ड दिले. सदरचे सिमकार्ड दुपारी अडीच वाजता सुरू झाल्यानंतर मोबाईलवर बँकेचा मेसेज आला असता त्यामध्ये माझे अकाऊंटवर फक्त २५०० रूपये असल्याचे मला समजले त्यानंतर बेल्हे येथिल बँकेत जाऊन सदर बाबत चौकशी केली असता.
माझे अकाऊंट वरुन ३ लाख २८ हजार रूपये काढून घेतले असल्याचे समजले.याबाबत आळेफाटा पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात इसमा विरूद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे हे करत आहेत.