विहीर खोदणारे ‘ते’ पोकलैंड मशीन वनविभागाने केले जप्त
1 min read
वडगाव कांदळी दि.२०:- जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील राखीव वनकक्ष क्रं-४४ मध्ये अवैध रित्या विहीर खोदण्याच्या गुन्हे प्रकरणी आरोपी राजाराम ज्ञानदेव फापाळे यास न्यायालय जुन्नर यांनी मंगळवार दि.१७ रोजी तीन दिवसांची कोठडी सुनाविन्यात आली होती. सदर वनपरिमंडळ खोडद वनगुन्हा क्रं-४०/२०२४-२५ मध्ये विहीर खोदकामासाठी वापरण्यात आलेले पोकलैंड मशीन दि.१९ रोजी वनविभागाकडुन जप्त करण्यात आले. राखीव वनक्षेत्रात विहीर खोदण्याच्या गुन्हयात सहभागी असणारे इतर लोक विनोद बर्डे व त्याचे सहकारी गणेश रामदास माळी, जयवंत हिरामण बर्डे,
नाथा तुकाराम बोऱ्हाडे, कैलास मधुकर बर्डे, मंजय निवृत्ती निकम, शरद हिरामण बर्डे, किसन हिरामण बर्डे, व अन्य इसम यांच्यावर ही वनविभागाकडुन कडक कारवाई करण्यात येणार असुन मौजे वडगाव कांदळी, येडगाव, हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद, निमगाव-सावा, बोरी बु इत्यादी गावांमधील लोकांना वनविभागाने आव्हान केले आहे.
की, राखीव वनक्षेत्रामध्ये अतिक्रमण करणे अवैध रित्या खोदकाम करणे, वन्यप्राणी शिकार करणे, अवैध वृक्षतोड अथवा अशा कोणत्याही कृत्यास, कोणत्याही प्रकारे सहकार्य केल्यास वनविभागाकडुन सबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
सदर कारवाई अमाले सातपुते (भा.व.से) उपवनसंरक्षक वनविभाग जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जन्नर, स्मिता राजहंस सहाय्यक वनसंरक्षक जन्नर, लहु ठोकळ वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर, निकीता बोटकर परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनपरिक्षेत्र ओतूर वनकर्मचारी समवेत पार पाडली असुन पुढील तपास लहु ठोकळ वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.