मेंढपाळांना बिबटपासून सुरक्षेसाठी जुन्नर वन विभागामार्फत ४०० सौर दिवे आणि तंबूचे वाटप
1 min read
आणे दि.६:- जुन्नर वनविभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्या पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घरगोठ्यांभोवती सौर कुंपण, नेक बेल्ट इत्यादी अनेक उपाययोजना वन विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून उघड्यावर झोपणा-या मेंढपाळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहून उपवनसंरक्षक अमोल सातपुते जुन्नर यांनी त्यांचेसाठी सौर दिवे आणि तंबूची संकल्पना मांडली.वन विभागाने हे सुरक्षिततेचे पाऊल तात्काळ उचलले असून.
जुन्नर वनविभागातील मेंढपाळांना शासकीय निधी उपलब्ध करत मेंढपाळांना राहण्यासाठी ४०० सौर दिवे आणि ४०० तंबू खरेदी केले असून मेंढपाळांना सदर वाटप करण्यात येत आहेत. सर्व तंबू आणि सौर दिवे उपलब्ध झाले असून पहिल्या टप्प्यात जुन्नर तालुक्यात ८५ तंबूचे वाटप पूर्ण झाले असून.
उर्वरित तंबू व सौर दिवे मेंढपाळांना आता उपलब्ध करून दिले जात आहेत असे अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर यांनी सांगितले.
सौर दिवे आणि तंबूमुळे बिबट हल्ला, सर्पदंश तसेच पाऊस व थंडी यापासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होईल असे लहू ठोकळ , वनपरीक्षेत्र अधिकारी ओतूर म्हणाले.आळे, पिपंरी पेंढार, उंब्रज, वडगांव आनंद, बेल्हे, निमगाव सावा, मंगरूळ, पारगाव तर्फे आळे, शिरोली तर्फे आळे, सुलतानपूर, येडगाव, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, वडगांव कांदळी, येथील वास्तव्यास असलेल्या एकुण ५५ मेंढपाळांना सौर दिवे व तंबूचे वाटप अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर यांच्या हस्ते करणेत आले.
सौर दिवा कशा प्रकारे वापरावा तसेच तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल याचे प्रात्यक्षिक कैलास भालेराव, वनरक्षक आळे, संतोष साळुंके, वनपाल खोडद व विशाल गुंड, वनरक्षक खोडद यांनी करून दाखवले यावेळी निकिता बोटकर वन परिक्षेत्र अधिकारी, रेस्क्यू टीम मेंबर संतोष कुतळ, रोशन भोर रवी केदार खंडू वामन आदी उपस्थित होते.