मीना शाखा कालवा हा एक मॉडेल कालवा बनवू:- प्रकाश वायसे
1 min read
आणे दि.६:- रब्बी हंगाम २०२४/२५ आवर्तन पूर्व आढावा बैठक प्रकाश वायसे सदस्य घोड /कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती तथा अध्यक्ष मीना शाखा कालवा यांच्या अध्यक्षतेखाली पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे संपन्न झाली.संस्था सक्षमीकरणासाठी आवश्यक बाबी, रब्बी हंगामातील पाण्याचे नियोजन करणे, पाणी वापर संस्थांनी सीसीएच्या प्रमाणात मागणी क्षेत्र देणे, सक्षम सचिवाची नेमणूक करणे, वितरिकास्तरीय संस्था तयार करणे, संस्थांचे ऑडिट, अनुदान आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
सुभाष झिंजाड यांनी प्रास्ताविक तसेच विशेष मार्गदर्शन केले यावेळी उपविभागीय अधिकारी आर.जी.हांडे, जांबुत शाखा अधिकारी एस.टी दाते, टाकळी हाजी शाखा अधिकारी पी .व्ही .पाटील शिरोली शाखा अधिकारी ए.एल. कुमावत उपस्थित होते.
तसेच मीना शाखा कालव्यावरील पाटबंधारे विभागाचे सर्व कर्मचारी संस्थांचे पदाधिकारी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.मीना शाखा कालव्यावरील अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. आवश्यकता भासेल तेव्हा सर्वजण सोबत रहा मीना शाखा कालवा हा एक मॉडेल कालवा बनवू असे.
अध्यक्ष भाषणात बोलताना प्रकाश वायसे यांनी सांगितले. यावेळी सिंचन क्षेत्रात उत्कृष्ट काम व संस्थांना बहुमोल मार्गदर्शन करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी एकूण तीन व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
ज्ञानेश्वर उंडे, इंद्रभान गायकवाड, धोंडीभाऊ भोर, विश्वनाथ येवले, संपतराव पानमन, अंकुश घोडे, आदींनी मनोगतात संस्थांना येणाऱ्या अडचणी विषयी समस्या मांडल्या पांडुरंग डुकरे यांनी आभार मानले.