माजी उपसरपंचाचा घराजवळ धारदार शस्त्राने खून
1 min read
Oplus_131072
शिक्रापूर दि.१:- शिक्रापूर (ता.शिरूर) माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे. अज्ञाताने माजी उपसरपंचावर रविवार (दी.१) दुपारी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अति रक्तस्त्राव झाल्यामुळे उपसरपंचाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरू केला आहे. अज्ञात तरुणाने धारदार शास्त्राने दत्तात्रय यांच्यावर त्यांच्या घराजवळच हल्ला केला.
त्यांच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेमुळे शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे. या घटनेची गंभीर दखल घेत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी या परिसरात बंदोबस्त लावला आहे.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तर आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहेत.