नारायणगावात धना मेथी व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला
1 min read
नारायणगाव दि.२७:- नारायणगाव येथील उपबाजार आवारात धना मेथी व्यापारी गणेश एरंडे (रा. खेड ता. खेड, जि. पुणे) यांच्यावर दि. २४ रोजी रात्री ८. २० वा सुमारास धना मेथी शेतमालाची खरेदी विक्री सुरु असताना एका अनोळखी व्यक्तीने व्यापारी गणेश एरंडे यांच्यावर लोखंडी शस्त्राने प्राणघातक हल्ला करून पळून गेला. या हल्ल्यात गणेश एरंडे गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जुन्नर बाजार समितीच्या वतीने लेखी निवेदन देऊन नारायणगाव पोलीसांकडे करण्यात आली आहे.
बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे,प्रियांका शेळके,बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे,उपसचिव शरद धोंगडे,चेतन रुकारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांची भेट घेऊन बाजार समितीच्या वतीने निवेदन दिले आहे.