साकुर ज्वेलर्स दरोड्यातील पाच आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; दागिने व पिस्तूल हस्तगत
1 min read
साकुर दि.१८:- संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकुर येथे घडलेल्या ज्वेलर्स दुकानातील दरोड्यातील पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना यश आले आहे. त्यांना बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २० तोळेसह १५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना पुढील तपासासाठी घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.९२ हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत दयावान उर्फ मनोज बाळासाहेब साठे, (वय २५, रा.गोरडवाडी, ता.माळशिरस, जि.सोलापूर),
अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या बाळु देवकर, (वय २२, रा.कौठेयमाई, ता.शिरूर, जि.पुणे), योगेश अंकुश कडाळे, वय २७, रा.धामणी, लोणी, ता.आंबेगाव, जि.पुणे), आकाश ठकाराम दंडवते, (वय २८, रा.मलठण, ता.शिरूर, जि.पुणे), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्यांच्याकडून ३० हजार रुपयांचा गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे असा ९२ हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर धोंडया महादु जाधव (फरार), मन्ना उर्फ सुरजसिंग उर्फ अजयसिंग (रा.पंजाब (फरार) यांचा शोध पोलीस घेत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयामध्ये मनोज साठे, रा.माळशिरस, जि.सोलापूर यास निष्पन्न करुन त्याचा व गुन्हयातील चोरी मनोज साठे याने केला.
असल्याचे तपासात पुढे आले. तसेच त्याचा साथीदार धोंडया जाधव, व सुनिल उर्फ निल चव्हाण, चोरीचा मुद्देमाल विक्रीकरण्याकरिता दिला असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यातील दागिने अभिषेक महेश तळेगावकर (रा.रविवार पेठ, पुणे) याचेकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगीतले.
त्यानुसार पथकाने अभिषेक महेश तळेगावकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १५ लाख ३ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.