लेण्याद्रीकडे येणारा रस्ता शनिवारी बंद: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
1 min read
जुन्नर दि.१९:- जुन्नर विधानसभा मतदार संघाकरिता झालेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी (दि. २३) श्री लेण्याद्री गणपती यात्रेनिवास इमारतीमध्ये होणार आहे. या दिवशी परिसरातील कायदा सुव्यवस्था कायम राहण्याकरिता लेण्याद्रीकडे येणारा मुख्य रस्ता वाहतुकीकरिता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. लेण्याद्री फाटा ते लेण्याद्री देवस्थान पायथा हा मुख्य रस्ता शुक्रवारी (दि. २२) रात्री १ वाजेपासून ते शनिवारी (दि. २३) मतमोजणी होईपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. शनिवारी मतमोजणी असल्याने लेण्याद्रीकडे जाणारा रस्ता वाहतुकीला बंद ठेवला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी स्पष्ट केले.