श्री रेडा संजीवन समाधी मंदिर पालखीचे उद्या प्रस्थान

1 min read

आळेफाटा दि.२०:- श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलाविलेल्या श्री रेडा संजीवन समाधी मंदिर ते आळंदी कार्तिक पायीवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवारी (ता.२१) रोजी होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होणाजी गुंजाळ, पालखी सोहळा समीतीचे अध्यक्ष दिपक टकले, पालखी सोहळा प्रमुख अरुण गुंजाळ, प्रितम काळे, राजेंद्र धोंगडे, सुनिल जाधव,निलेश पिंगळे, कार्याध्यक्ष नागेश कु-हाडे, व्यवस्थापक कान्हू पाटील कुऱ्हाडे यांनी दिली.आळे (ता.जुन्नर) येथील ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्या श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिराचा पायी वारी दिंडी सोहळ्याचे दि.२१ रोजी प्रस्थान होणार असुन. हा दिंडी सोहळा आळे, नारायणगाव, पेठ, चाकण, आळंदी या ठिकाणी सोमवार दि.२५ रोजी पोहचणार असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे