जुन्नर मध्ये ११ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद; ६८.९४ टक्के मतदान
1 min read
जुन्नर दि.२१:- जुन्नर विधानसभा मतदार संघामधील ३ लाख २५ हजार ७६४ मतदारांपैकी २ लाख २४ हजार ५८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६८.९४% इतके मतदान झाले आहे.
या मतदारसंघात एकूण पुरुष मतदार संख्या १ लाख ६५ हजार ३८६ इतकी असून त्यापैकी १ लाख १८ हजार ४५ जणांनी मतदान केले. तर महिला मतदार संख्या १ लाख ६० हजार ३८५ इतकी असून त्यापैकी १ लाख ६५ हजार ३६ महिलांनी मतदान केले.
या मतदारसंघात बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत २२४५ ८५ इतके मतदान झालेले असून ६८.९४ टक्के इतके मतदान झालेले आहे.
या मतदार संघातील ग्रामीण तसेच शहरी भागात मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने मतदानाकरिता बाहेर पडले होते.
जुन्नर विधानसभा निवडणुकीकरिता ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या सर्वांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालेले असून या झालेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी (दि.२३) सकाळपासून सुरू होणार आहे.