आळेफाट्या ऐवजी वाहने जातायत साकोरीत; चुकीचा दिशा दर्शक फलक
1 min read
बेल्हे दि.१६:- बेल्हे – जेजुरी महामार्गावर चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे अनेक वाहन चालकाची दिशाभूल होत आहे. हा दिशादर्शक फलक दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक करत आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेल्हे – जेजुरी महामार्गावरती ढगीमळा जवळ महामार्गावर महामार्ग प्रशासनाने दिशादर्शक फलक लावला आहे. त्या ठिकाणी आळेफाटा चाबाण दिला आहे तो रस्ता साकोरी गावात जातो.
त्यामुळे आळेफाटा येथे जाणारी वाहने साकोरी गावात जात आहेत. वाहनचालकांना तसेच साकोरी ग्रामस्थांना आळेफाट्याचा वारंवार रस्ता सांगण्याचा मनस्ताप होत आहे.वाहन चालकांना पुन्हा युटर्न मारून यावं लागत असून वाहन चालकांचा वेळ व इंधन वाया जात आहे.
या दिशादर्शक फलकामुळे वाहनधारकांची फसवणूक होत असल्याने हा दिशादर्शक फलक बदलावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.