मी जिवंत असेपर्यंत त्यांना पाणी नेऊ देणार नसल्याचा इशारा आमदार अतुल बेनके यांचा इशारा

1 min read

कोपरे दि.१६:- महाविकास आघाडीचे नेते डिंभे -माणिकडोह बोगदा करून आपल्या जुन्नर तालुक्याचे हक्काचे पाणी नेण्याच्या ज्या वल्गना करत आहे ते पाणी अतुल बेनके जिवंत असेपर्यंत त्यांना नेऊ देणार नसल्याचा इशारा आमदार अतुल बेनके यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मांडवे – कोपरे येथे बोलताना दिला.आमदार अतुल बेनके बोलताना म्हणाले की जुन्नर तालुक्यात जल सिंचनाची क्रांती स्व. वल्लभ बेनके यांच्यामुळे झाली असून सिंचनाची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहे उर्वरित १० टक्के कामे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.स्वर्गीय वल्लभ बेनके यांच्या काळापासून आदिवासी समाज बेनके परिवाराबरोबर राहिला आहे आदिवासी बांधवांच्या सुख दुःखद आमदार बेनके यांचा सहवास लाभलेला आहे. या भागात जनतेने विकाससाठी बेनके यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आव्हान मुथाळणे गावचे सरपंच दामू गोडे यांनी केले आहेत.श्री गोडे म्हणाले की विरोधी लोक येतील आश्वासन देतील त्याकडे लक्ष न देता परिसरातील मतदारांनी आमदार अतुल बेनके यांच्या पाठीमागे उभे राहावे व प्रचंड मतांनी त्यांना विजयी करावे असे आवाहन सरपंच दामू गोडे यांनी आपल्या भाषणात केले.यावेळी दौऱ्यात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, पुणे जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका पुजा बुट्टे माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव तांबे आदिवासी नेते काळु शेळकंदे मारुती वायाळ विनायक तांबे सरपंच दामू गोडे, कोपरे सरपंच रोहिणीताई माळी, सरपंच भिमराव मुठे भाऊसाहेब साबळे खुबी सरपंच विजय काटे शंकर माळी तळेरान सरपंच गोविंद साबळे फसाबाई कवठे दीपक मोठे राजू गायकर तुकाराम जोशी संजय पोकळे, तुकाराम जोशी, बबन गभाले बाबा, लक्ष्मण पोफले ,दारकू पोफळे,राहुल सोनवणे सचिन देठे संतोष गमाले ,शंकर पोफळे,भास्कर तातळे अंकुश ढोंगिरे किसन दुदे आकाश पोकळे दादाभाऊ वरे मारुती गभाले यशवंत ढोंगरे प्रवीण दाभाडे वसंत गमाले चिंधु पोफळे अविनाश सोनवणे तुषार पोफळे प्रकाश दाभाडे सुदाम पोफळे सावळाराम दगडू ढोंगिरे अंकुश दाभाडे अतुल दाभाडे उल्हास बुळे रविंद्र माळवे बाळू दाभाडे दाभाडे कुंडलिक दाभाडे सह विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे