श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालयात बालदिन साजरा
1 min read
निमगाव सावा दि.१४:- श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगांव सावा (ता.जुन्नर) येथे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी अशोक भगवान उघडे (साकोरी, जुन्नर) हे उपस्थित होते. तर नवनाथ सावकार गाडगे उपाध्यक्ष पांडुरंग सार्वजनिक वाचनालय हे अध्यक्ष होते. प्रमुख पाहुणे अशोक उघडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. नंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी कवी अशोक उघडे यांनी पुस्तक वाचनाचे महत्व काव्य वाचनातून सादर केले.
तसेच वाचनालयचे ज्येष्ठ संचालक बबन जिजाबा गाडगे यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी खूप छान माहिती सांगितली. त्या नंतर त्यांचा शाल व श्रीफळ देऊन वाचनालयाचे उपाध्यक्ष नवनाथ सावकार गाडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी अशोक उघडे, अरविंद गाडगे रिटायर पोलिस मुंबई, नवनाथ गाडगे उपाध्यक्ष पांडुरंग सार्वजनिक वाचनालय, बबन जिजाबा गाडगे संचालक, सखाहरी महाराज खाडे संचालक, अल्ताफ पटेल सामाजिक कार्यकर्ते, रामदास घोडे सामाजिक कार्यकर्ते
हकीम पटेल वाचक, सुधाकर उनवणे सामाजिक कार्यकर्ते, ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक नवनाथ गाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सखाहरी महाराज खाडे यांनी केले व चहापान झाल्यावर कार्यक्रम संपन्न झाला.