प्रचारदौऱ्या दरम्यान सत्यशील शेरकर यांनी सोडवली ग्रामस्थांची विजेची समस्या

1 min read

जळवंडी दि.१०:- गावभेट प्रचार दौऱ्यानिमित्त जुन्नर तालुक्यातील घाटघर, जळवंडी व खडकुंबे गावातील ग्रामस्थांशी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनी संवाद साधला. यावेळी महिला भगिनींनी औक्षण करत व जेष्ठ मंडळींनी आशिर्वाद देत मोठ्या उत्साहात शेरकर याचे उपस्थित सर्व सहकाऱ्यांचे स्वागत केले. ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेत असताना या भागात लाईटची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे, असं निदर्शनास आलं. अक्षरशः लखलखत्या दिव्यांचा सण असणाऱ्या दिवाळीच्या दिवशी देखील या भागात लाईट नसल्याची दुर्दैवी बाब जेव्हा ग्रामस्थांनी शेरकर यांच्या कानावर घातली. तेव्हा लगेच त्यांनी महावितरण विभागाशी संपर्क साधला. जर दिवाळीच्याच दिवशी लाईट नसेल तर विद्यमान लोकप्रतिनिधी कोणत्या विकासाच्या वल्गना करत आहे? हा प्रश्न शेरकर यांनी उपस्थित केला.लवकरात लवकर गावातील लाईटची समस्या दूर करून हा भाग प्रकाशमय करणार, असा शब्द शेरकर यांनी ग्रामस्थांना दिला. या प्रसंगी किरण शेळकंदे, कुमार शिंगाडे, रघु रावते, विशाल आधारी, रामदास रडे, संदीप आधारी, संदीप शिंगाडे, चिमाजी शिंगाडे, जळवंडी, नामदेव दादा जधार, सखाराम मुगदुम, लक्ष्मण बांगर, बाळू सोनवणे, खंडू धाडवड, धर्मा सरवदे, बाळू करंदे, अक्षय गारे, सोमा गारे, मारुती सरवदे यांच्यासह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे