जुन्नर तालुक्यात गुलाबी थंडीची चाहूल; वातावरणात गारवा

1 min read

जुन्नर दि.१२:- जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. गुलाबी थंडीची चाहूल सुरु झाली आहे. वातावरणात मोठा बदल झाला आहे. काही गावांचा पारा हा कमालीचा कमी झाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर सोबत पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या वातावरणामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. थंड वातावरण हे शेतकऱ्यांनी पेरलेल्या ज्वारी, गहू व हरभरा पिकासाठी लाभदायक ठरत असून वाढीसाठी पोषक आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे