डॉ.बसवराज बकाली यांनी सांगितली यशाची पंचसूत्री
1 min readबेल्हे दि.८:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे या तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये नुकतेच “अभियांत्रिकीतील क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी” या विषयावर एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड चे क्लस्टर हेड डॉ.बसवराज बकाली यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्राचार्य प्रा.अनिल कपिले,प्रा.संजय कंधारे, समर्थ आयटीआयचे उपप्राचार्य विष्णू मापारी,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.बसवराज बकाली म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचे नियोजन करत असताना सकारात्मक दृष्टिकोन,नम्रता,सातत्यपूर्ण सराव,चिकाटी,वक्तशीरपणा या यशाच्या पंचसूत्रीचा अवलंब करून आपला उत्कर्ष साधावा.यावेळी डॉ.बकाली यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्र व अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यवसायाच्या विविध संधी या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.संभाषण कौशल्याबरोबर सॉफ्ट स्किल हे देखील महत्त्वाचे आहे.मुलाखतीची पूर्वतयारी करण्यासाठी प्रथम आपण आपल्या विषयाबद्दलचे ज्ञान आणि सॉफ्ट स्किल व संभाषण कौशल्य महत्त्वाचे असल्याचे यावेळी डॉ.बसवराज बकाली यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय कंधारे यांनी,प्रास्ताविक प्राचार्य अनिल कपिले यांनी तर आभार टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले यांनी मानले.