आमदार अतुल बेनके यांना ओतूर परिसरात मतदारांचा मोठा प्रतिसाद
1 min read
ओतूर दि.२:- ओतूर येथे विधानसभा निवडणूक प्रचार दौरा आणि दिवाळीच्या निमित्ताने आमदार अतुल बेनके यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच, हजरत मस्तानशाह दर्गा येथेही भेट दिल्या. ओतूर आणि परिसरात कोट्यावधींची विकास कामे गेल्या ५ वर्षात झाली आहेत. यात ओतूर ग्रामीण रुग्णालयाचे आधुनिकीकरण या कामाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. रस्ते विकास, वीज वितरण, जल सिंचन, क्रीडा संकुल, सामाजिक सभागृह अशा विविध विभागांची अनेक कामे मार्गी लावण्यात यश आले आहे.
इतर उर्वरित कामे येत्या काळात जनतेच्या आशिर्वादाने नक्कीच पूर्ण करणार असे ग्रामस्थांना आमदार बेनके यांनी आश्वासित केले.जुन्नर तालुक्यातील जनतेच्या पाठिंब्यामुळे गेल्या ५ वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
आणि महायुती चा उमेदवार म्हणून मला जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन यावेळी आमदार अतुल बेनके यांनी नागरिकांना केले.