जांभुळशी, कोपरे, मांडवे गावांना सत्यशील शेरकर यांची भेट व मतदारांशी संवाद

1 min read

जुन्नर दि.२:- दिवाळी पाडवा निमित्त तसेच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जांभुळशी, कोपरे, मांडवे गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी सत्यशील शेरकर यांनी संवाद साधला.जांभुळशी गावातील मारुती मंदिरात मारुतीरायाचे मनोभावे दर्शन घेतले आणि विचारांची लढाई लढण्याचं बळ दे, अशी प्रार्थना केली.गावागावात फिरत असताना शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा प्रतिसाद ग्रामस्थांकडून मिळत आहे. हा प्रतिसाद आत्मविश्वास वाढवणारा असून आपण विधानसभेची लढाई नक्की जिंकू, हा विश्वास आहे.असे मत शेरकर यांनी व्यक्त केले.याप्रसंगी रोहिणी माळी, ठमाजी कवटे, राहूल सोनवणे, लक्ष्मण हगवणे, भास्कर हगवणे, राहुल कौटे, ज्ञानदेव हगवणे, सुनिल कोकाटे, भिमराज मुठे, राजू मुठे, शंकर माळी, ज्ञानेश्वर मुठे शिवाजी माळी, दीपक माळवे, ज्ञानदेव दाभाडे, विपुल बोळे, अनिल दाभाडे, संजय दाभाडे, रामदास दाभाडे, सतीश बोळे, बबन दाभाडे यांच्यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे