कांदळी, निमगाव सावा, नारायणगावात पोलिसांचे पथसंचलन
1 min read
निमगाव सावा दि.२:- जुन्नर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव पोलिस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील निमगाव सावा, नारायणगाव, कांदळी, परिसरात पथसंचलन करण्यात आले. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी नारायणगाव कांदळी येथील मशीद व निमगाव सावा येथील मशीद व गावठाण परिसरात पथसंचलन केले. पथसंचलनात नारायणगाव पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी,२० अंमलदार,जुन्नर उपविभागातील सीआरपीची दोन पथके, सीआयएसएफचे अधिकारी, ४४ जवान, चार वाहने आदी फौजफाटा सहभागी होता.