दिवाळीनिमित्त अतुल बेनकेंचा गावभेट दौरा; प्रचारात बेनके आघाडीवर

1 min read

जुन्नर दि.१:- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अतुल बेनके गाव भेट दौरे करीत असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या मावळ पट्ट्यात बेनके यांनी गुरुवारी (दि.३१) बेलसर, आमलेवाडी, दत्त मंदिर आश्रम, राळेगण, काठेवाडी, बोऱ्हाडेवाडी, वाघेवाडी, भिवाडे, हातवीज, आंबे, पिंपरवाडी, सुकाळवेढे, जावळेवाडी, हिवरेपठार गावातील वाडी वस्त्यांवर जाऊन गावभेट दौरे करून मतदारांची भेट घेतली. यावेळी आदिवासी बांधवांनी बेनके यांचे उत्स्फूर्त स्वागत करून जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. यावेळी बेनके यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील रस्ते चांगले झाले आहे. त्यामुळे शेतात पिकविलेल्या शेतमालाला शहाराची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला. आदिवासींच्या मूलभूत गरजा व समस्या सोडविण्यासाठी त्या भागातील जनतेने सांगितलेली कामे प्राधान्य क्रमाने पूर्ण केली असल्याचे बेनके यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे