आमदार अतुल बेनके ३३ हजार मतांचे मताधिक्य घेऊन निवडून येतील; सोमवारी अर्ज भरण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे:- पांडुरंग पवार
1 min read
जुन्नर दि.२७:- आमदार अतुल बेनके यांचा उमेदवारी अर्ज भरताना महायुतीतील सर्व घटक पक्ष बेनके यांना समर्थन, प्रगतशी देण्यासाठी उपस्थित राहतील. मागील पाच वर्षांत तालुक्यात विकासाची कामे केली, त्या कामाच्या जोरावर आम्हाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे निरीक्षक आणि समन्वयक नेमण्यात आले असून ३३ हजार मतांचे मताधिक्य घेऊन अतुल बेनके विजयी होतील. असे मत पांडुरंग पवार यांनी व्यक्त केले.
तसेच आमदार बेनके यांचा उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक 28 रोजी भरण्यात येणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यावेळी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी केले आहे.