आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी ३३०० कोटीचा निधी आणला:- संजय काळे
1 min readजुन्नर दि.२७:- तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी ३३०० कोटीचा निधी आणला आहे. जुन्नर शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला आजपर्यंत न मिळालेला ६० ते ७० कोटीचा निधी मिळवून दिला. जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांना भक्कमपणे आधार दिला. आदिवासी बांधवांसाठी हिरडा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी १४ कोटीचा निधी दिला. जुन्नर तालुक्याला पाणी कमी पडू नये यासाठी आमदारातील बेनके यांनी योग्य नियोजन केले. बेनके हे तालुक्यासाठी योग्य उमेदवार असून ते पुन्हा निवडून येतील. असे मत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी व्यक्त केले व सोमवारी अर्ज भरण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.